Skip to main content

Posts

Showing posts from June, 2018

दान धर्माची बदललेली परिभाषा

नमस्कार! बरेच वेळा मनात विचार येतात पण लिहिण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच करत आहे. तरी चूक भूल माफी असावी. आजकाल Whatsapp आणि Facebook यांच्यामुळे जग जवळ आले आहे, पण सगळ्याच गोष्टी share करण्याचा जणु छंदच लोकांना जडला आहे. अर्थात थोड्याफार प्रमाणात मी पण share करत असतो पण अगदी थोडक्या प्रमाणात. आता कोणी दानधर्म करत असेल तर तो पण यावर सर्रास Share केला जातो, मुळात दान याची वाख्याच लोक विसरत चालले आहे. याचीसुद्धा मार्केटिंग होऊ लागली आहे. मुळात दान हे निस्वार्थ भावनेने केले पाहिजे (असे दान ज्याला परताव्याची इच्छा नसते), जेव्हा लोक आपण दान करतो असा दाखवायचा प्रयत्न करतात मग ते facebook share असो किवां whatsapp status,post किवां इतर कोणतेही माध्यम याचा अर्थ असा कि दान करताना या लोकांनी मला प्रसिद्धी मिळेल किवां मी किती दानशुर आहे हे दाखवण्याची भावना मनात ठेवून केलेले दान होय. अशी परताव्याची भावना मनात ठेवून केलेले दान हे दान नसून व्यवहाराच नाही का? व्यवहारात जस आपण पैसे देऊन त्या बदल्यात वस्तू,सेवा खरेदी करतो, तसेच परताव्याचा विचार करून केलेले दान म्हणजे व्यवहाराच. असो माझे विचार ...